Ad will apear here
Next
पुनर्वसन प्राधिकरणाच्या उपाध्यक्षपदी माधव भांडारी
माधव भांडारीमुंबई : प्रकल्पग्रस्तांचे पुनर्वसन अधिक चांगल्या रितीने होण्यासाठी राज्य सरकारने ‘महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा राज्य पुनर्वसन व पुनर्स्थापना संनियंत्रण समिती’ स्थापन केली आहे. प्राधिकरणाच्या उपाध्यक्षपदी भारतीय जनता पक्षाचे प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांची नियुक्ती केली असून, त्यांना कॅबिनेट मंत्री दर्जा देण्यात आला आहे. या नियुक्तीबद्दल भाजप प्रदेशाध्यक्ष खासदार रावसाहेब पाटील दानवे यांनी भांडारी यांचे अभिनंदन केले आहे.

प्राधिकरण तथा समितीचे पदसिद्ध अध्यक्ष मदत व पुनर्वसन मंत्री चंद्रकांत पाटील आहेत. शासन निर्णयानुसार समितीचे सदस्य महसूलमंत्री, जलसंपदामंत्री, वित्तमंत्री, उद्योगमंत्री व वनमंत्री असतील. संनियंत्रण समितीचे मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणून मदत व पुनर्वसन विभागाचे अपर मुख्य सचिव काम पाहतील.

महाराष्ट्र राज्य पुनर्वसन प्राधिकरण तथा राज्य पुनर्वसन संनियंत्रण समितीचे अधिकार सरकारने स्पष्ट केले आहेत. त्यानुसार कोणत्याही केंद्र अथवा राज्य सरकारी किंवा निमसरकारी किंवा स्थानिक स्वराज्य संस्था यंत्रणेने हाती घेतलेल्या प्रकल्पामुळे बाधित झालेल्या व्यक्तींच्या पुनर्वसनाची कामे संनियंत्रण समितीमार्फत करण्यात येतील. यासाठी संबंधित प्रकल्प संस्था प्राधिकरण तथा समितीशी करार करेल व आर्थिक तरतूद उपलब्ध करून देईल. पुनर्वसनासाठी धोरणात्मक निर्णय घेणे व नियम तयार करणे याचा अधिकार समितीकडे असेल. पुनर्वसनासाठी समिती खासगी यंत्रणेची मदत घेऊ शकते. पुनर्वसनाचे अंतिम आर्थिक व प्रशासकीय निर्णय घेण्याचे अधिकार समितीला असतील.

राज्यस्तरीय पुनर्वसन प्राधिकरणाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्याबद्दल भांडारी यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, प्रदेशाध्यक्ष खा. रावसाहेब पाटील-दानवे तसेच महसूल व मदत पुनर्वसनमंत्री चंद्रकांत पाटील यांचे आभार मानले.

भांडारी म्हणाले की, ‘राज्यातील प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनासाठी आपण यापूर्वीपासूनच काम करत आहोत. प्रकल्पग्रस्तांच्या पुनर्वसनाचे दीर्घकाळ रेंगाळलेले प्रश्न सुटावेत, पुनर्वसन अधिक चांगल्या रितीने व्हावे व विकास प्रकल्प मार्गी लागावेत यासाठी राज्य शासनाने आता एकत्रित प्राधिकरण तथा समिती स्थापन केली आहे. प्राधिकरणाच्या उपाध्यक्षपदी नियुक्ती झाल्यामुळे प्रकल्पग्रस्तांसाठी अधिक प्रभावीपणे काम करण्याची संधी आपल्याला मिळाली आहे. ही जबाबदारी पार पाडण्यासाठी आपण सर्वतोपरी प्रयत्न करू.’
 
Feel free to share this article: https://www.bytesofindia.com/P/NZKYBN
Similar Posts
‘चंद्रकांत पाटील यांच्या संघटन कौशल्यामुळे भाजप अधिक मजबूत बनेल’ मुंबई : ‘भारतीय जनता पक्षाचे नवनियुक्त प्रदेशाध्यक्ष महसूलमंत्री चंद्रकांत पाटील यांनी पदभार स्वीकारल्यानंतर नव्या पर्वाला सुरुवात झाली असून, त्यांच्या संघटन कौशल्यामुळे सरकार व जनतेमधील संघटनेचा सेतू अधिक मजबूत बनेल,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी येथे व्यक्त केला.
‘भाजपचे डावखरे विजयी होतील’ मुंबई : ‘विधान परिषदेच्या कोकण पदवीधर मतदारसंघात भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवारीसाठी निरंजन डावखरे यांची केंद्रीय नेतृत्वाकडे शिफारस केली असून, ते निवडणुकीत निश्चित विजयी होतील,’ असा विश्वास मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी गुरुवारी (ता. २४) व्यक्त केला, तर ‘निरंजन डावखरे यांच्या विजयामुळे कोकणात भाजपला
‘संवाद आणि सूक्ष्म नियोजनावर अधिक भर द्यावा’ मुंबई : ‘भारतीय जनता पक्षाच्या सर्व पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी येणार्‍या काळात संवाद आणि सूक्ष्म नियोजनावर अधिक भर दिला पाहिजे,’ असे आवाहन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रदेश पदाधिकारी आणि जिल्हाध्यक्षांच्या बैठकीत केले.
‘भाजप’ प्रदेश कार्यकारिणी बैठक २८ जानेवारीला मुंबई : ‘भारतीय जनता पक्षाच्या (भाजप) प्रदेश कार्यकारिणीची बैठक २८ जानेवारी २०१९ रोजी जालना येथे होणार आहे,’ अशी माहिती ‘भाजप’ प्रदेश मुख्य प्रवक्ते माधव भांडारी यांनी २२ जानेवारीला दिली.

Is something wrong?
ठिकाण निवडा
किंवा

Select Feeds (Section / Topic / City / Area / Author etc.)
+
ही लिंक शेअर करा
व्यक्ती आणि वल्ली स्त्री-शक्ती कलाकारी दिनमणी
Select Language